By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
कोरोनावर लस शोधून त्याचा प्रयोग करणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला. या लसीचा पहिला डोस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला देण्यात आला. पुतीन यांच्या मुलीला दोन वेळा या लसीचा डोस देण्यात आला. डोस दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील तापमानात बदल झाल्याची नोंद करण्यात आली आहे.पुतीन यांच्यानुसार, पहिला डोस दिल्यावर त्यांच्या शरीरातील तापमान 38 अंश सेल्सिअस होतं. लसीचा दुसरा डोस दिल्यानंतर तापमान 1 अंशाने आणखी घटलं. मात्र, काही वेळाने तापमान आणखी वाढलं आणि त्यानंतर हळूहळू तापमान सामान्य झालं.
दोन मुलींपैकी कोणाला लस टोचली?
पुतीन यांना दोन मुली आहेत. मारिया आणि कतरिना. कोरोनाची लस या दोघींपैकी कोणाला टोचली याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, मुलीला लस दिल्यानंतर तिची प्रकृती ठीक आहे, अशी माहिती पुतीन यांनी दिली. तिच्या शरीरात अनेक अँटीबॉडीज तयार झाल्या, असंही त्यांनी सांगितलं.
20 देशांकडून लससाठी ऑर्डर
जगभरातील 20 देशांनी आमच्या लस Sputnik V साठी प्री-ऑर्डर दिली आहे. रशियाचं डायरेक्ट इंवेस्टमेंट फंड मोठ्या प्रमाणात लसी तयार करण्यासाठी आणि परदेशात जाहिरात करण्यासाठी गुंतवणूक करीत आहेत, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली. भारत, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, ब्राझिल, मेक्सिको या देशांनी ही लस खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा रशियाच्या वेबसाईटने केला आहे.
रशियाच्या वेबसाईटनुसार, 2020 च्या अखेरपर्यंत या लसीचे 20 कोटी डोस तयार करण्यात येण्याची योजना तयार करण्यात येणार आहे. यापैकी 3 कोटी डोस रशिया स्वत:साठी ठेवणार आहे. या लसीचं उत्पादन सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. रशियाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अनेक देशांमध्ये करण्याची योजना आखत आहे. यामध्ये सौदी अरब, ब्राझिल, भारत आणि फिलीपाईन्स या देशांचा समावेश आहे.
पहिल्या उपग्रहाच्या नावावर लसीचं नामकरण
रशियाने या लसीचं नाव पहिला उपग्रह Sputnik V च्या नावावर ठेवण्यात आलं आहे. याला 1957 मध्ये लाँन्च करण्यात आलं होतं. रशियाने दोन महिन्यांपूर्वी याबाबतचे संकेत दिले होते की त्यांची लस चाचणीमध्ये सर्वात पुढे आहे. मात्र, रशियाच्या या लसीवर अमेरिका आणि ब्रिटनला अद्यापही संशय आहे. इतकंच नाही तर रशियावर लसीचा फॉर्म्युला चोरल्याचा आरोपही लावण्यात आला आहे.
नागपुरात दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. दुकानातील कर....
अधिक वाचा