ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

"बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान", सामनातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2020 10:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शहर : मुंबई

अयोध्येतील राम मंदिराचे आज (5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सामना वृत्तपत्राने राम मंदिराच्या भूमीपूजनावर अग्रलेख लिहिला आहे. या अग्रलेखात हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिले आहे.

बाबरी पाडली त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. या कृतीनं बाळासाहब ठाकरे हिंदूह्रदयसम्राट बनले. आजही ते स्थान अढळ आहे. सगळ्याच्या त्यागातून, संघर्षातून रक्त आणि बलिदानातून राममंदिर या मातीत कारसेवकांच्या त्यागाचा गंध आहे हे विसणारे रामद्रोही ठरतील. राममंदिर भूमीपूजनाच्या प्रश्नाने राजकारणही कायमचे संपावे. श्रीरामाचीही तीच इच्छा असेल, सारा देश आज एकसुरात गर्जत आहे, असं अग्रलेखात म्हटले आहे.

शरयू नदीने तेव्हा राममंदिरासाठी गोळ्या झेलणाऱ्या शेकडो कारसेवकांना पोटात घेतले. रामभक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीच्या तीरावर भव्य मंदिराचा संकल्प पूर्ण होत आहे. हा ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक भारतीयांची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण आहे. रामायण हा भारतीय जनतेचा प्राण आहे. राम हा रामायणाचा प्राण आहे. राम हा मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी आहे. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे साहस आहे. राम म्हणजे आपल्या देशाची एकात्मता आहे. अशा रामाचे मंदिर त्याच्याच अयोध्या नगरीत, त्याच्या जन्मस्थानी व्हावे यासाठी हिंदूना मोठा लढा द्यावा लागला. त्या लढ्याची सांगता आज होत आहे, असंही अग्रलेखात सांगितले आहे.

हा लढा प्रत्यक्ष भूमीवर झाला आणि न्यायालयातही झाला. रामामंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या न्यायालयीन लढाईतीली मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी याला पाठवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजून ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर रामजन्मभूमीच्या वाद संपलेला आहे. इक्बाल अन्सारी हा एकटा नव्हता, पण न्यायालयात राममंदिराविरोधी लढा देणाऱ्या बाबरी अॅक्शन कमिटीचा तो एक प्रमुख चेहरा होता. त्याच्या पाठीमागे अनेक इस्लामी संघटनांनी मोठी शक्ती उभी केली होती. अन्सारीने न्यायालयातली लढाई 30 वर्षे खेचली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले. पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुत्यातून बाहेर काढले, असं अग्रलेखात म्हटले आहे.

मागे

Ram Mandir : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात
Ram Mandir : अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्रमास सुरुवात

अयोध्येत प्रभू राम यांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन कार्यक्....

अधिक वाचा

पुढे  

भारताच्या पहिल्या कोरोना लसीची किंमत किती असणार?
भारताच्या पहिल्या कोरोना लसीची किंमत किती असणार?

भारताच्या पहिल्या कोरोना लसीबाबत अनेकांना मनात उत्सुकता आहे (Covaxin cost wil be less than water....

Read more