By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 03:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची भगवी ओळख सर्वत्र आहे. मात्र शिवसेनेचा हा भगवा रंग, ही भगवी ओळखच अचानक गायब झाल्याने प्रश्न उपस्थित झाला आहे. धनुष्यबाणाच्या पाठिमागे असणारा भगवा रंग बदलण्यात आला आहे. भगव्याऐवजी पांढरा रंग टाकण्यात आल्याने नेटकरयांनी तसेच शिवसैनिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या याआधीच्या प्रोफाईल पिक्चरमध्ये काळ्या रंगात धनुष्यबाण आणि त्यामागे भगवा रंग होता. मात्र बदलण्यात आलेल्या प्रोफाईल पिक्चरवर अनेक नेटीझन्स आणि शिवसैनिकांनी कमेंट करुन भगवा रंग कुठे गेला? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा भगवा रंग हा हिंदुत्ववाद्यांचे प्रतिक मानले जाते. महाराष्ट्रातील आणि दिल्लीत भगवा फडकवणार अशा घोषणा शिवसेनेद्वारे नेहमी केल्या जातात.
पाकिस्तानमधील वैमानिकांच्या पहिल्या तुकडीला 2017 मध्ये प्रशिक्षण दिले होते. ....
अधिक वाचा