ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर, तुकोबांच्या पालखीचे 24 जूनला प्रस्थान

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 04:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर, तुकोबांच्या पालखीचे 24 जूनला प्रस्थान

शहर : पुणे

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या 334 व्या पालखी सोहळ्याला श्री क्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी सोमवारी (दि. 24 जून) प्रस्थानाने प्रारंभ होणार आहे. 26 जूनला पालखी सोहळा पुण्यात मुक्कामी असेल. 11 जुलैला श्री क्षेत्र पंढरपुरला पोहचणार आहे. हा पालखी सोहळा 16 जुलैला परतीच्या प्रवासाला प्रारंभ होईल. 28 जुलै रोजी सोहळ्याची 28 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरात समारोप होणार आहे.
पालखी सोहळा पंढरीकडे जाताना 29 जून रोजी असणारी (ज्येष्ठ कृष्ण 11) एकादशी यंदा यवत होणार असल्याची, तर प्रदूषण मुक्त हरीत वारी’, झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश जनजागृती करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प मधुकर मोरे यांनी पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. काशिनाथ मोरे, ह.भ.प. अजित मोरे, ह.भ.प. संजय मोरे, विश्वस्त ह.भ.प विशाल मोरे, ह.भ.प. माणिक मोरे, ह.भ.प. संतोष मोरे यांच्या उपस्थित देण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ करण्यात आले आहे. नैमितीक कामे संस्थानच्या वतीने सुरू केली आहेत. परंपरेनुसार यंदा पालखीचा पुणे येथील नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात दोन मुक्काम वगळता प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले, इंदापूरनंतर सराटी येथील माने विद्यालयाजवळ गोल रिंगण होणार असून, माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा, तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरीवर भाविकांना उभे रिंगण पहायला मिळणार आहे.

संत तुकाराम पालखी सोहळा प्रमुखाची नावे जाहीर

देहुरोड - श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 334 वा पालखी सोहळ्यातील पालखी सोहळा प्रमुखाची नावे जाहीर करण्यात आली आहे. पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प काशीनाथ मोरे, ह.भ.प अजित मोरे, ह.भ.प. संजय मोरे यांची नावे विश्वस्त ह.भ.प विशाल मोरे, ह.भ.प माणिक मोरे, ह.भ.प. संतोष मोरे यांच्या उपस्थित संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प मधुकर मोरे यांनी जाहीर केले आहे.

परतीचे मुक्काम

16 जुलै वाखरी, 17 जुलै महाळुंगे माकडाचे, 18 जुलै वडापुरी, 19 जुलै लासुर्णे, 20 जुलै बर्‍हाणपूर, 21 जुलै हिंगणीगाडा, 22 जुलै वरवंड, 23 जुलै उरूळी कांचन, 24 जुलै हडपसर येथील बंटर हायस्कूल, 25 आणि 26 जुलै नवी पेठ पुणे येथील श्री विठ्ठल मंदिर, 27 जुलै पिंपरी येथील श्री भैरवनाथ मंदिर, 28 जुलै रोजी श्री क्षेत्र देहूगाव येथे पालखी सोहळ्याची सांगता होईल.

असा असेल पालखीचा प्रवास

24 जून रोजी देहूतील मुख्य मंदिरात पालखी प्रस्थान कार्यक्रम होणार आहे. पहिला मुक्काम श्री क्षेत्र देहुगाव येथील इनामदार साहेब वाड्यात होईल. 25 जून आकुर्डी विठ्ठलमंदिर, 26 आणि 27 जून श्री निवडुंगा श्री विठ्ठल मंदिर, नाना पेठ पुणे, 28 जून लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, 29 जून यवत, 30 जून वरवंड, 1 जुलै उंडवडी गवळ्याची, 2 जुलै बारामती शारदा विद्यालय, 3 जुलै सणसर, 4 जुलै (बेलवडी गोल रिंगण), निमगाव केतकी, 5 जुलै इंदापूर येथे (गोल रिंगण) इंदापूर, 6 जुलै सराटी, 7 जुलै अकलूज (माने विद्यालय येथे गोल रिंगण), 8 जुलै बोरगाव (माळीनगर येथे उभे रिंगण), 9 जुलै पिराची कुरोली (तोंडले बोंडले येथे धावा), 10 जुलै वाखरी तळ (बाजीराव विहिर येथे उभेरिंगण) मुक्काम करणार असून, पालखी सोहळा 11 जुलै रोजी दुपारी एक वाजल्यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी विसावणार आहे. तर 12 जुलैला नगर प्रदक्षिणा करून पालखी 16 जुलै दुपारी एक वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. 16 जुलैला दुपारी श्री क्षेत्र पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला सुरूवात होणार आहे.

मागे

2014 नंतर देशात 942 स्फोट; राहुल गांधींचा दावा 
2014 नंतर देशात 942 स्फोट; राहुल गांधींचा दावा 

देशात 2014 नंतर 942 स्फोट झाल्याचा दावा राहूल गांधी यांनी  केला आहे. नक्षलवाद्य....

अधिक वाचा

पुढे  

झाकीर नाईकची ईडीकडून 50 कोटींची संपत्ती जप्त
झाकीर नाईकची ईडीकडून 50 कोटींची संपत्ती जप्त

वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकची 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती सक्तवसुली स....

Read more