ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2020 02:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षणाच्या प्रश्नाला दिशा द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजे

शहर : सोलापूर

राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ, असं नुसतं बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर तुम्हाला जे राजकारण करायचेय ते करत बसा, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारला फटकारले. तसेच आता सकल मराठा समाजाचा आवाज महाराष्ट्रात घुमायला पाहिजे. तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. ते शुक्रवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात बोलेत होते. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांवर टीकास्त्र सोडले. केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाची कोणतीही पर्वा नाही.

आरक्षण सोडा पण 2014 पासून आजपर्यंत सरकारने मराठा समाजाचे बाकीचे प्रश्न तरी सोडावलेत का? महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या ३२ टक्के आहे. मग त्यांना मदत का केली गेली नाही? मराठा समाजातील तरुणांना घडवणाऱ्या सारथी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्यात आली? नुसता जीआर काढून किंवा महामंडळांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही होत नाही, असा टोलाही संभाजीराजे यांनी सरकारला लगावला.

तसेच मला कोणत्याही पक्षाशी देणेघेणे नाही, मी राष्ट्रपतीनियुक्त खासदार आहे. गेल्या सरकारच्या काळापासून मी याच गोष्टी बोलत असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. आता मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.तत्पूर्वी सोलापुरातील आजच्या मराठा ठोक क्रांती मोर्चाला लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या आंदोलकांकडून उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधा घोषणाबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणादरम्यान आंदोलकांना कोणतीही जाळपोळ किंवा नासधूस न करण्याचे आवाहनही केले.

मागे

मराठीसाठी लेखिकेचा 20 तास ठिय्या, मुजोर सराफाकडून अखेर माफी!
मराठीसाठी लेखिकेचा 20 तास ठिय्या, मुजोर सराफाकडून अखेर माफी!

मराठीचा आग्रह धरल्याने सराफाने अपमानास्पद वागणूक दिल्याने मुंबईतील कुलाब....

अधिक वाचा

पुढे  

ना सुट्टी, ना वेळेची मर्यादा, डिसेंबरपासून 365 दिवस 24 तास RTGS सेवा; शुल्क आणि नियम काय?
ना सुट्टी, ना वेळेची मर्यादा, डिसेंबरपासून 365 दिवस 24 तास RTGS सेवा; शुल्क आणि नियम काय?

आरबीआयनं आज एक मोठी घोषणा केली असून, 2020 डिसेंबरपासून 24 तास 365 दिवस RTGS सेवा उपलब्....

Read more