By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2020 10:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारकडून होत आहे. तर विरोधी पक्ष केंद्राकडून मदत येईपर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, अशी मागणी करत आहे. महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात सुरु असलेल्या या कलगीतुऱ्यावर भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर दोघांना सल्ला दिला आहे
#ओला दुष्काळ! #मराठवाडा !
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 22, 2020
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. pic.twitter.com/ntVVoixBjf
“सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करुन शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवावी. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरुर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे”, असं संभाजीराजे म्हणाले
संभाजीराजे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीसाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना काय आदेश दिले होते, याबाबत माहिती आहे. ते वाचून तरी सत्ताधारी आणि विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा टोला संभाजीराजे यांनी लगावला आहे.
संभाजीराजेंनी शेअर केलेल्या फोटोत शिवाजी महाराजांनी अधिकाऱ्यांना दिलेले आदेश लिहिले आहेत. “कष्ट करुन गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला तो द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करु नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल”, असे शिवाजी महाराजांचे आदेश संभाजीराजेंनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा
उद्धव ठाकरे काल (21 ऑक्टोबर) उस्मानाबादच्या दौऱ्यावर होते. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला.
“मी इथे केवळ आकडे सांगायला आलो नाही. केवळ तुम्हाला बरे वाटावं म्हणून आकड्यांची फेकाफेक करणार नाही. आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत 80 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं समाधान होईल अशी मदत तुम्हाला केली जाईल. तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. तुमच्या सुखा समाधानासाठी जे जे करता येईल, ते मी करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रजा फाऊंडेशनकडून मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचं चालू कार्यकाळातील ‘प....
अधिक वाचा