By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे - सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज, पुण्यातील सारथी संस्थेच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्याभरातून शेकडो विद्यार्थी पुण्यात दाखल झाले असून अनेक ठिकाणी भगवे झेंडे आणि सारथी बचाव आंदोलनाचे फ्लेक्स लावण्या असून सारथीला मोठ्या प्रमाणात निधी द्या, प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांच्यावर कारवाई करा, असे फलकही आंदोलकांनी झळकविले.
मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेबाबत (सारथी) विविध आदेश काढून, संस्थेला बदनामा केले जात आहे, असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला असून लाक्षणिक उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सारथी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेही उपोषणाला बसले आहेत.
“आम्ही कोणीही पक्षविरोधी बोलणार नाही, कुणीतरी म्हणालं मी खाली बसलो. तर मी खाली बसलो नाही तर जनतेच्या बरोबर बसलो आहे. शाहू महाराज असेच, जनतेबरोबर बसत होते. मात्र मला खाली मांडीला मांडी लावून बसायला उशीर लागला. असं असलं तरच मी शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाईन”, असं संभाजीराजे म्हणाले.
“आपला माणूस आपला पेक्षा मोठा व्हावा, ही शाहू महाराजांचा भूमिका होती, आरक्षणाने सर्व समस्या सुटणार नाही, समाजातील मुले अधिकारी झाली तर हे जिवंत स्मारक ठरेल. मात्र हे मोडून टाकण्याचं कारस्थान केलं जात आहे”, असा घणाघात संभाजीराजेंनी केला.
बुलडाणा - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायम....
अधिक वाचा