By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 27, 2019 08:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : औरंगाबाद
औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात ‘समृद्धी’ या वाघिणींने चार बछड्यांना जन्म दिला आहे. यातील दोन बछडे हे पांढर्या रंगाचे आहेत, तर दोन बछडे हे पिवळ्या रंगाचे आहेत. महापालिकेच्या प्राणी संग्रहालयातील सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघांच्या जोडीपासून हे बछडे जन्मले आहेत. यापूर्वी या प्राणी संग्रहालयात जन्मलेल्या वाघांना देशातील इतर वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच बिबट्यांच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला असल्याने, यावेळी खबरदारी म्हणून समृद्धी आणि तिच्या पिलांची काळजी घेण्यात येत आहे.
देगलूरमध्ये आज सकाळी भीषण अपघात झाला. मुलाच्या लग्नासाठी हैदराबादला जात ....
अधिक वाचा