ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अयोध्या निकालाचे स्वागत, मुस्लिम बांधवांकडून दुर्गामातेची पूजा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2019 12:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अयोध्या निकालाचे स्वागत, मुस्लिम बांधवांकडून दुर्गामातेची पूजा

शहर : मुंबई

रामजन्मभूमी आणि बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे तालुक्यातील सर्व जाती धर्मातील जनतेने स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करत सांगलीतील मुस्लिम महिला, पुरुषांसह भाजपचे मुस्लिम सेलचे अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी सांगलीतील दुर्गामाता मंदिर येथे जाऊन दुर्गामातेची पूजा केली.

यावेळी मुस्लिम बांधवांनी आरती करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला. आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने विविधेत एकता असलेल्या दैशातील सर्व धर्मिय बांधवामध्ये भावनिक आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्याच्या दृष्टीने व भारत हा सर्व धर्मियांचा देश आहे.

देशाची अखंडता टिकवण्यासाठी ऐतिहासिक व महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालाचे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना आणि धार्मिक संघटनेच्या प्रमुखांनी स्वागत केल असताना मुस्लिम बांधवांनी दुर्गामाताची आरती करत शांतता आणि एकता अखंड राहण्यासाठी प्रार्थना केली. मुस्लिम महिलेच्या हाती आरतीचे ताट देऊन त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी देखील या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले.

मागे

Ayodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया
Ayodhya verdict : रामजन्मभूमीप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया

अयोध्या राजमन्मभूमीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकालाची घोषणा ....

अधिक वाचा

पुढे  

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे निधन
माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे निधन

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन शेषन यांचे रविवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे....

Read more