By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 05, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
मिरजमधील सिव्हिल रुग्णालयाने दाखल असलेल्या 3 रुग्णांना रस्त्यावर फेकल्याच्या संतापजनक प्रकार उघडीस आला आहे. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की मिरजमधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज देऊन दुसर्या रुग्णालयात नेत असल्याचे सांगत रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले. सांगलीतील जुना कुपवाडा रस्त्यावर या तिघांना फेकून देण्यात आले होते. रस्त्यावर 3 मृतदेह आणून टाकल्याची अफवा पसरताच जागरूक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारासाठी एक रुग्ण दगावला तर दोघे निपचिप पडून होते. त्यांच्यावर बेवारस कुत्री हल्ला करण्याची शक्यता होती. म्हणून नागरिकांनी संजय नगर पोलिसांना ही खबर दिली. त्याच वेळी तेथील सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मुजावर यांच्या गाडीतून या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे वेळेवर उपचार न झाल्याने शिवलिंग कुचबुरे हा रुग्ण मरणं पावला. अशाप्रकारे या रुग्णांना अमानवी कृत्य करणार्या रुग्णालय प्रशासनावर आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बेळगावसह इतर मराठी भाषिक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ आज बेळगावसह ....
अधिक वाचा