By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 07:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात (Sangli Rain Update) पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने नदीच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. आज दुपारी 2 वाजता कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर पोहोचली. ही पाणी पातळी काल (6 ऑगस्ट) रात्री 24 फुटांवर होती.
वारणा धरण 84.44 टक्के भरलं
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणा परिसरात मागील चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे वारणा धरण 84.44 टक्के भरलं आहे. काल सुरु केलेला साडेचार हजार चारशे क्यूसेसक्स पाण्याचा विसर्ग आजही सुरु आहे. पाणी पातळीत वाढ होत असून, शिराळा तालुक्यातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत. नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. ओढे – नालेही तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. सांगली जिल्ह्यात आताच्या घडीला तरी कोणाचे स्थलांतर किंवा गावांचा संपर्क तुटलेला नाही.
सांगली जिल्ह्यातील नेहमी पूरबाधित होणाऱ्या गावांना नवीन यांत्रिक बोटी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या या 15 यांत्रिक बोटींचं कृष्णा नदीमध्ये प्रत्याक्षिक घेण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बंदरे आणि परीवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटींची चाचणी घेतली आहे.
2019 ला महापुराचा सर्वात मोठा फटका बसलेल्या सांगलीवाडीला यावेळी यांत्रिक बोट मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ....
अधिक वाचा