By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 31, 2024 01:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे महानगरपालिकेत सर्वात मोठा सॅनिटरी नॅपकीन घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पुणे महापालिका हद्दीतील 38 हजार विद्यार्थीनीना गेली दोन वर्षे सॅनिटरी नॅपकिन मिळालेच नाहीत. भाजपा आमदार-खासदार यांच्या टेंडरमध्येच सॅनिटरी नॅपकिन अडकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेत सर्वात मोठा सॅनिटरी नॅपकीन घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पुणे महापालिका हद्दीतील 38 हजार विद्यार्थीनीना गेली दोन वर्षे सॅनिटरी नॅपकिन मिळालेच नाहीत. भाजपा आमदार-खासदार यांच्या टेंडरमध्येच सॅनिटरी नॅपकिन अडकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून पुणे महापालिकेच्या हद्दीतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन मिळालेच नाहीत. भाजपचे खासदार, आमदार यांच्या टक्केवारी वरून वाद सुरू आहेत. टेंडर देण्यावरून महापालिकेत आमदार खासदार मध्येच भांडण सुरू आहे. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या आधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा काँग्रेसने केला आरोप आहे. मात्र यामुळे विद्यार्थिनींना, मुलींना मोठा मनस्ताप भोगावा लागत आहे.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि पुण्यातील कॅन्टोमेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे याचा टेंडरवरून वाद सुरू आहे. पैसे खाण्यावरून त्यांच्यात भांडण सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त कुणाच्या दाबावाखाली काम करत आहेत ? जर दाबावाखाली काम करत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही काँग्रेसने सुनावले.
याप्रकरणाची दखल घेण्यात यावी तसेच कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. भाजपा नेते अगदी खालच्या स्तरावर जाऊन वागत आहेत. मात्र त्यांच्या वादाचा, फटका पुणे महापालिका हद्दीतील मुलींना बसला आहे. याप्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे. तसेच याप्रकरणी वेळेवर नाही कारवाई झाली तर काँग्रेस, महापालिकेत जाऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
अयोध्येतील राम मंदिराचं नुकतंच उद्घाटन झालं. 22 जानेवारीला रामलल्लांच्या म....
अधिक वाचा