By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनची पोलिस ठाण्यात व्यवस्था करण्यात आलीय. बंदोबस्तामध्ये किंवा कर्तव्य बजावताना आलेल्या मासिक पाळीमुळे महिला पोलिसांची कुचंबणा होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांच्या महिला पोलिसांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आलीय. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या संकल्पनेतील 'स्मार्ट मैत्रीण' अभियानचे उदघाटन त्यांच्या पत्नी शर्मिला बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. स्मार्ट मैत्रीण अभियानातंर्गत महिला पोलिस कार्यरत असलेल्या सर्व ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग आणि सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर बसविण्यात येणार आहे. मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या महिलांची संख्या अधिक आहे. पोलिस ठाण्याबरोबर गुन्हे शाखा, विशेष शाखा तसेच बंदोबस्त शाखेत महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून त्यांना मासिक पाळीदरम्यान कर्तव्य बजावताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तर, सॅनिटरी नॅपकिन अभावी होणारी महिला पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी 'स्मार्ट मैत्रीण अभियान' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तर, या अभियानांतर्गत मुंबईतील सर्व पोलिस ठाणी, विभागीय कार्यालये तसेच इतर शाखांमध्ये १४० सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग' आणि सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेटर बसविण्यात येणार आहेत
आरामदायी आणि हवेशीर अशा बम्बार्डियर लोकल गाडय़ांची मध्य रेल्वे अजूनही प....
अधिक वाचा