By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2020 06:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (5 एप्रिल) रात्री 9 वाजता 9 मिनिटं दिवे लावण्याचं आवाहन केलं. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या या आवाहनावर सडकून टीका केली आहे (Sanjay Raut on Candle light appeal of PM Modi). मोदींनी लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा ढोल वाजवले गेले. आता दिवे लावायला सांगितल्यावर आग लावली नाही म्हणजे झालं, असा उपरोधात्मक टोला राऊत यांनी मोदींना लगावला. तसेच दिवा जळेलच, पण सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय केलं ते सांगा, अशी मागणीही केली. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली.
संजय राऊत म्हणाले, “मोदींनी लोकांना जेव्हा टाळ्या वाजवायला सांगितलं, तेव्हा लोकांनी रस्त्यावर जमा होऊन ढोल वाजवले. आता त्यांनी स्वतःच्या घरालाच आग लावली नाही म्हणजे झालं. सर दिवे तर लावूच, पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार काय प्रयत्न करतंय हेही आम्हाला सांगा. साहेब कामाचं आणि लोकांच्या पोटा पाण्याचं बोलां.”
दरम्यान, मोदींच्या या आवाहनावर काँग्रेसनेही निशाण साधला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटलं आहे, “कोरोना विषाणूने थैमान घातलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवे लावा, टाळ्या वाजवा, असे इव्हेंट करुन परिस्थितीचं गांभीर्य घालवत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या सुचना भाजप सरकारने तात्काळ अंमलात आणून लोकांना दिलासा द्यावा.” काँग्रेसने आपल्या या ट्विटमध्ये एक हॅशटॅग वापरत मोदींनी देशापेक्षा प्रसिद्धीला अधिक महत्त्व दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “आधी टाळी-थाळी आणि आता कँडल लायटिंग. मोदी सरकारने प्रसिद्धीसाठीचे हे स्टंट बंद करावेत आणि रुग्णालयं, व्हेंटिलेटर, कोरोना चाचणी प्रयोगशाळा या आघाडीवर काम करावं. भारताला आता कृतीची गरज आहे, इव्हेंट मॅनेजमेंटची नाही.”
रविवारी 9 मिनिटं दिवे लावा. पंतप्रधानांनी 9 मिनिटांच्या दिखावूपणापेक्षा या महारोगामुळे ज्या लोकांना त्रास होत आहे त्यांच्या आयुष्यात प्रकाश यावा यावर भर द्यावा. कृपया वास्तववादी व्हा आणि देशात खरा प्रकाश पसरवा, असं मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं.
मागच्या दोन दिवसात ६४७ रुग्ण वाढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दि....
अधिक वाचा