ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आज से जंगलराज खतम, मंगलराज शुरु'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 10, 2020 10:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'आज से जंगलराज खतम, मंगलराज शुरु'

शहर : मुंबई

'जे कल येतायेत ते पाहता, एक तरुण नेता केंद्रातल्या सत्तेला सुद्धा काटे की टक्कर देतोय. तेजस्वी पर्व सुरू होतंय असं चित्र आहे तसेच आता  देशाने २०२४ साठी आत्मचिंतन करावे,' असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बिहार निवडणूकीचे निकाल (Bihar Election Results 2020) काही वेळातच स्पष्ट होतील. अमेरिकेच्या निकालाप्रमाणे बिहारचा निकाल देखील वेगळा असेल असा विश्वास शिवसेनेने स्पष्ट केला होता. आता बिहारच्या निकालावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजून बिहार निवडणूक निकाल पूर्ण यायचे आहेत. तेजस्वीच्या समोर पूर्ण मंत्रिमंडळ होतं. मात्र या मुलाने ज्याप्रकारे टक्कर दिली आहे. हे भविष्याकरता मोठं संकेत आहे, असं राऊत म्हणाले. आता महाराष्ट्रात परिवर्तन झालं तेव्हा संपूर्ण देशाला संदेश गेला. आपण परिवर्तन करू शकतो आणि याचा रिझल्ट आपण पाहतो आहे, असं देखील राऊत म्हणाले.

बिहारचा निकाल काही लागू द्या, पण ज्या प्रकारे जनतेने साहस दखवलंय, त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होणार. 'जंगलराज आज से खतम होगा, मंगलराज आज से शुरू होगा'.  बिहार मध्ये लोकांना बदल हवा होता तो दिसतोय, असं म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे.बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या भाषणात विकासाचे मुद्दे, रोजगाराचे मुद्दे यायला हवे होते. पण ते आलेच नाहीत.

मागे

३० नोव्हेंबरपर्यंत 'या' राज्यात फटाके फोडल्यास दीड ते ६ वर्षांची शिक्षा
३० नोव्हेंबरपर्यंत 'या' राज्यात फटाके फोडल्यास दीड ते ६ वर्षांची शिक्षा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. एवढचं ....

अधिक वाचा

पुढे  

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास रस्त्यावरील लढाई तीव्र करु,ओबीसी समाजाचा सरकारला इशारा
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास रस्त्यावरील लढाई तीव्र करु,ओबीसी समाजाचा सरकारला इशारा

“मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये. तसं केल्यास रस्त्यावरील....

Read more