ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकरी आंदोलन पेटलं! दिल्लीत संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2020 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकरी आंदोलन पेटलं! दिल्लीत संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

शहर : देश

दिल्ली-हरियाणा सीमेवर (सिंघू बॉर्डर) आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंग (Sant Baba Ram Singh ) यांनी बुधवारी स्वत: ला गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा रामसिंग हे करनालचे रहिवासी होते. त्याची एक सुसाइड नोटही समोर आली असून, त्यात त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवित असल्याचं नमूद केलं आहे.

बाबांच्या सेवादार गुरमीत सिंह यांनीही घटनेची खातरजमा केली. असे सांगितले जात आहे की, बाबांचे फक्त हरियाणा आणि पंजाबमध्येच नव्हे तर जगभरात कोट्यवधी अनुयायी आहेत. सिंघू बॉर्डरवर आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा रामसिंग कर्नाल यांनी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. मला शेतकऱ्यांचं दुःख मला बघवत नाही आणि केंद्र सरकार काही करत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे, असं सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे.

मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने शेतकर्‍याचा मृत्यू

कुंडली सीमेवर केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बटर खान (वय 42) हे पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील भिंडर या गावी राहणारे गावकरी, सहकाऱ्यांसह कुंडलीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनात सामील होण्यासाठी तीन दिवसांपूर्वी आले होते. दररोज एका शेतकऱ्याचा मृत्यू होत असल्याचंही शेतकरी नेते सांगतात. कोरोना युगात, हिवाळ्यामध्ये उघड्यावर असे प्रदर्शन करणे खूप आव्हानात्मक आहे. शेतकरी खूप मजबूत आहेत. ते म्हणाले की, 6 महिन्यांपर्यंत आंदोलनाची तयारी आहे. या आंदोलनात सहभागी 11 हून अधिक शेतकरी आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत.

नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्ली, हरियाणा येथील शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फे-या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.

 

मागे

पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय
पुण्याचा पसारा पुन्हा वाढला ! अजित पवारांच्या पुढाकारात मोठा निर्णय

पुणे महापालिका हद्दीत 23 गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्ताव....

अधिक वाचा

पुढे  

Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा पेच सर्वोच्च न्यायालयात; आज पुन्हा सुनावणी
Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा पेच सर्वोच्च न्यायालयात; आज पुन्हा सुनावणी

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या 22 दिवसां....

Read more