ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सांताक्रूझ आग्रीपाड्यात गटाराच्या पाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सांताक्रूझ आग्रीपाड्यात गटाराच्या पाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात...

शहर : मुंबई

मुंबई -सांताक्रूझ (पूर्व) येथील पालिकेच्या एच (पूर्व) भागात आग्रीपाडा परिसरातील साईबाबा चाळ कमिटीच्या गल्लीत गटाराच्या दूषित पाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याच वाहत्या गटाराच्या गुढगाभर पाण्यातून तेथील रहिवाशांना पहाटे पाणी भरावे लागते. त्यातूनच ये - जा करावी लागत आहे. परिणामी येथील रहिवाशी विविध साथीच्या रोगांनी त्रस्त झाले आहेत.दुर्दैव असे की रहिवाश्यांच्या या समस्येकडे सर्वपक्षीय स्थानिक नेतेही दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, आग्रीपाडा परिसरातीत मेट्रोचे बांधकाम करण्यात येत आहे. त्याचे माती मिश्रित पाणी व रॅबीट गटारात टाकतात. शिवाय त्याच ठिकाणी एस. आर. ए. च्या प्रकल्पाअंतर्गत विकासक इमारतीचे बांधकाम करीत असून त्याचेही रॅबिट गटारात टाकल्याने गटाराचे पाणी जाण्याचा मार्ग बंद होतो. मग गटाराचे सर्व घाण पाणी तेथे पसरते. त्यातूनच नाईलाजाने रहिवाशांना मार्गक्रमणा करावी लागते.वारंवार तक्रार करूनही एच/पूर्व महानगरपालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जर हा प्रकार थांबला नाही तर रास्तारोको आंदोलन करावे लागेल असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. 

                                                                                        

                                                                   

                                                                   

मागे

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगरुळ जातीचे मासे; बघ्यांची गर्दी वाढली
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगरुळ जातीचे मासे; बघ्यांची गर्दी वाढली

रायगड - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक वेगळं चित्र पहायला मिळालं. रस्त....

अधिक वाचा

पुढे  

...आणि काँग्रेसचा तीव्र विरोध, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत गदारोळ
...आणि काँग्रेसचा तीव्र विरोध, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता त....

Read more