By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 09, 2019 05:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे-२०१० मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेला संतोष वसंत शेलार उर्फ विश्व हा तरुण माओवादी कमांडर असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी देताच एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील भवानी पेठ मधील, कासेवडी येथील संतोष कुटुबियांसह राहात होता. त्याने ९ वी तून शाळा सोडली होती. नंतर त्याने संस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. तो कबीर कला मंचा मधेही काम करीत होता. मात्र ९ वर्षापूर्वी तो अचानक बेपत्ता झाला. त्यावेळी त्यांच्या घरच्यानेही शोध घेतला. पण त्याची कुठेच काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी यासंबंधी खडक पोलिस ठाण्यामध्ये तक्रार ही दाखल केली होती.
दरम्यान छत्तीसगड पोलिसांनी माओवाद्यांची एक यादी तयार केली आहे. या यादी नुसार माओवाद्यांचा शोध घेत असताना संतोषची माहिती पोलिसांना मिळाली. संतोष सध्या माओवादी संघटनेत काम करीत आहे. तो राजनांदगाव या ठिकाणचा तांडा एरिया कामितीचा कमांडर असल्याची माहिती मिळाली आहे.
मालशेज घाटात दरडी कोसळणे आणि दुर्घटना घडण्याचे प्रकार लक्षात घेऊन ठाण्याच....
अधिक वाचा