ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मॉस्को मध्ये इस्रोच्या संवाद केंद्राला मंजूरी

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 07:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मॉस्को मध्ये इस्रोच्या संवाद केंद्राला मंजूरी

शहर : delhi

इस्रो तर्फे देण्यात आलेल्या संवाद केंद्राच्या प्रस्तावाला मोदी यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. रशिया व आसपासच्या देशांशी तंत्रज्ञानाच्या आधारे संवाद साधण्यासाठी संवाद केंद्र असावे असा प्रस्ताव सादर केला गेला होता. या केंद्रामुळे भारताला आता इतर देशातले संशोधक, सरकारी संस्था आणि उद्योग क्षेत्राशी समन्वय साधणे तसेच या केंद्रांमुळे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातल्या द्विपक्षीय कार्यक्रमात सहकार्य वाढवणे शक्य होईल. या केंद्रासाठी दीड कोटी चा खर्च दरवर्षी अपेक्षित आहे.

15 ऑगस्ट 2022 रोजी भारतातर्फे पहिले मानव असलेले गगनयान अंतराळात झेपावणार आहे. या  मोहिमेसाठी भारताला काही तंत्रज्ञान आणि सुविधांची गरज लागणार आहे. त्यासाठी या केंद्राची मदत घेतली जाऊन इतर देशांचे सहकार्य मिळवंल जाणार आहे. या केंद्रासाठी इस्रो कडून एक संवाद अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. त्याची नियुक्ती इस्रो चे शास्त्रज्ञ करतील. इस्रोची अमेरिकेत वॉशिंग्टन तर फ्रान्समधे पॅरिस येथेही अशी संवाद केंद्रे आहेत.

मागे

प्रकाशन विभागाच्या ई-प्रकल्पांचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
प्रकाशन विभागाच्या ई-प्रकल्पांचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीतील सूचना भवन येथे प्रकाशन विभागाच्या अनेक ई-प्रकल्पांचे उद्घाटन के....

अधिक वाचा

पुढे  

इलेक्ट्रिक वाहनावर 5 टक्के जीएसटी
इलेक्ट्रिक वाहनावर 5 टक्के जीएसटी

1ऑगस्ट पासून काही नियमांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे त्याचा लाभ सर्वांनाच ह....

Read more