By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 02:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
सरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात 'मेक इन इंडिया' उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्कृष्ट कामगिरी साठी देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या सरक्षण मंत्री पुरस्कारासाठी च्या स्पर्धेत उतरण्याकरिता खाजगी क्षेत्राला ही परवानगी दिली आहे. यापूर्वी या वार्षिक पुरस्कारासाठी केवळ आयुध कारखाने आणि सरक्षण सार्वजनिक क्षेत्र एकके यांच्यातच स्पर्धा असे कुठल्याही राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार स्पर्धेस खाजगी क्षेत्र पात्र नव्हते .
सरक्षण मंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरंक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात औद्योगिक पाया विस्तारण्यास मदत होईल. तसेच देशी आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सर्वोत्कृष्ट भारतीय फर्म्स शोधण्यास सहाय्य मिळेल. तसेच भारतीय सरंक्षण उद्योगाच्या विशेषत: सुष्म , लघु आणि मध्यम उद्योग व स्टार्ट अपच्या निर्यात क्षेत्राला चालना मिळेल , अशी अपेक्षा आहे. पुरस्कारासाठीची नामांकने ऑनलाइन आमंत्रित केली जातील . यासाठी वेबपोर्टल उपलब्ध केले जाणार आहे.
मध्ये रेल्वे मार्गावर दररोज काही न काही कारणास्तव प्रवाशांचा खोळंबा होत अस....
अधिक वाचा