By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 22, 2020 09:52 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
राजधानी नवी दिल्लीत कोरोनाने थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत रोज चार ते पाच हजार कोरोना केसेस समोर येत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 879 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे तर 111 रुग्ण कोरोनाने मृत्यू पावले आहेत. दिल्लीतील हीच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सचखंड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची औरंगाबादेत कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा कहर सुरु असल्याने महाराष्ट्राने सावध पावले टाकायला सुरुवात केली आहे. दिल्लीवरुन औरंगाबादेत येणाऱ्या सचखंड एक्सप्रेसच्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. सचखंड एक्सप्रेसने दिल्लीतील अनेक प्रवाशी औरंगाबादमध्ये येतात. दिल्लीमधून आलेल्या प्रवाश्यांमुळेऔरंगाबाद शहरात कोरोना वाढू शकतो, ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे स्टेशनवरच प्रवाश्यांच्या कोरोना चाचण्या होणार आहे. तसंच संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तातडीने क्वारन्टाईन केलं जाणार आहे.
दिल्लीत बाधित होण्याचा दर 12.90 आहे. दिल्लीत आतापर्यंत 8 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 45 हजार 662 कोरोना टेस्ट केल्या गेल्या होत्या. त्यातील 21 हजार 845 टेस्ट आरटीपीसीआर होत्या तर उरलेल्या अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. दिल्लीत मृतांची संख्या देखील अचानक वाढू लागली आहे. पाठीमागच्या दहा दिवसांत चौथ्यांदा 100 हून अधिक नागरिकांना जीवाला मुकावे लागले आहे.
दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 23 हजार 117 एवढी झालेली आहे. त्यातील 4 लाख 75 हजार 103 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. दिल्लीत सध्या 4 हजार 633 कन्टेन्मेंट झोन आहेत.ही संख्या आता वाढण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील नागरिकांचा निष्काळजीपणा आणि सरकारचा हलगर्जीपणा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास कारणीभूत असल्याचं एका सर्व्हेतून आढळून आलं आहे. ‘इंडिया टुडे’ने मुंबई आणि दिल्लीच्या कोरोना परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची पाच मुख्ये कारणे नमूद केली आहेत. तुलनेत मुंबईने कोरोनावर अत्यंत सुयोनियोजितपणे नियंत्रण आणल्याचंही नमूद केलं आहे.
सणांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मेट्रो आणि बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा घाईने घेतलेला निर्णय, लॉकडाऊनमध्ये दिलेली सवलत, कोविड सेंटरची कमतरता आणि मोहिमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आलेलं अपयश या पाच कारणांमुळे दिल्लीतील कोरोना नियंत्रणाचा कार्यक्रम फसल्याचं या अहवालातून पुढे आलं आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये सध्या गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा....
अधिक वाचा