ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना  

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 23, 2019 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना  

शहर : delhi

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर , नेताजी सुभाष चंद्र बोस, भगतसिंग यांचे पुतळे एकाच ठिकाणी लावले गेले. त्यामुळे एबीवीपी व एनएसयूआयमध्ये तनावजन्य परिस्थिती तयार झाली होती. त्यातच कॉंग्रेस प्रणीत 'नॅशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया' ने दिल्ली विद्यापीठातील कला शाखेच्या विभागाबाहेर लावण्यात आलेल्या सावरकरांच्या पुतळयाला काळ फासून चपला हार घातला. त्याच सोबत 'भगतसिंग अमर रहे , बोस अमर रहे' अश्या घोषणाही दिल्या. त्यामुळे तेथील परिस्थिती अजूनच बिघडली.

सदर प्रकरणात विद्यापीठाच्या आवारातील कला विभागाबाहेर मंगळवारी नेताजी बोस, सावरकर, आणि भगत सिंग यांचे पुतळे बसवण्यात आले होते. त्यात 'नॅशनल स्टूडेंट्स ऑफ इंडिया' ने सावरकरांच्या पुतळ्याला बोस व भगतसिंग यांच्या पुतळ्यासोबत लावण्यावरून आक्षेप नोंदविला होता. मात्र तरीही हे पुतळे लावण्यात आले. त्यामुळे संतप्त होऊन एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. व त्याचे फोटो ही व्हायरल केले.

याबाबत दिल्ली विद्यापीठाच्या प्रॉक्टर नीता सहगल यांनी DUSU च्या माजी अध्यक्ष शक्ती सिंह यांना बुधवारी कारणे दाखवा नोटीस जारी केली. हे पुतळे विद्यापीठाच्या आवारात बसविण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. विद्यापीठ एबीवीपीच्या विचारांनी काम करत असल्याचा आरोप एनएसयूआय च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.  

मागे

हीरे उद्योगातही मंदीमुळे 15 हजार कारागीर बेरोजगार
हीरे उद्योगातही मंदीमुळे 15 हजार कारागीर बेरोजगार

हीर्‍यांची नगरी म्हणून ओळख असलेल्या गुजरातमधील सूरतलाही मंदीची झळ बसू ला....

अधिक वाचा

पुढे  

चंद्रयान 2 ने पाठविले पहिले छायाचित्र
चंद्रयान 2 ने पाठविले पहिले छायाचित्र

इस्रोची महत्वाकांक्षी मोहीम म्हणून गाजत असलेल्या चंद्रयान 2 ने दोन दिवसांप....

Read more