By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 06:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, अशा उत्कट भावना यावेळी सयाजींनी बोलून दाखवल्या.
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा उद्देश समोर ठेवून दुष्काळी माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना आणली आहे,
सयाजी यांनी आज वडगाव दडसवाडा या ठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांच्यासोबत दुष्काळी भागातील माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यामध्ये जांभूळ, चिंच, आवळा यांची सुमारे एक हजार पाचशे झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला.सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रुत आहे. राज्यात ठिकठिकाणी त्यांनी आतापर्यंत वृक्षारोपण केले आहे. त्याचप्रमाणे सैनिकांसाठीची त्यांची तळमळही वारंवार व्यक्त होत असते.
सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 255 जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी याआधीही दुष्काळी भागात हजारो झाडे लावली आहेत.
शहीद जवानांच्या कुटुंबाकडून लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जवानाची स्मृती जागृत करुन देणारे असल्याच्या भावना सयाजी शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्यादेशातील पहिलं वृक्ष संमेलन सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड होते. या संमेलनात सयाजी शिंदेनीही उपस्थितांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला होता.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांन....
अधिक वाचा