ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 17, 2021 01:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सावधान! KYC च्या नावाने ग्राहकांची फसवणूक, SBI बँकेचा मोठा इशारा

शहर : देश

देशात सायबर क्राईम ही समस्या पोलिसांठी मोठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. हॅकर्सकडून अनेकांना लुबाडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याच घटनांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवर व्हिडीओ जारी करत ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बँक KYC पद्धतीने ग्राहकांशी बातचित करुन सत्यता पडताळणी करते. मात्र, याच पद्धतीचा वापर करुन काही भामटे सर्वसामान्यांना लुबाडण्याचं काम करत असल्याचं स्टेट बँकेने ट्विटरवर सांगितलं आहे. त्यामुळे स्टेट बँकेने KYC च्या नावाने करण्यात आलेल्या बनावट फोन कॉलच्या बळी पडू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

स्टेट बँकेने ट्विटरवर नेमकं काय म्हटलंय?

“KYC पद्धतीने ग्राहकांची सत्य माहिती पडताळणी करण्याच्या नावाने काही लोक तुमची फसवणूक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा. त्यामुळे कोणत्याही कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका. चोरटे फोनवर बोलताना बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगत खोटं नाटक करतात किंवा मसेज करतात. पण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असं स्टेट बँकेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

कुणासोबतही OTP शेअर करु नका. रिमोट ॅक्सेस ॅप्सपासून सावध राहा. आपल्या आधारकार्डची कॉपी कुणासोबतही शेअर करु नका. वेळोवेळी आपला पासवर्ड बदला. कुणाहीसोबत आपला मोबाईल नंबर आणि गोपनीय माहिती शेअर करु नका. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी विचार करा, असंदेखील व्हिडीओत म्हटलं आहे.

गृहमंत्रालयाचाही इशारा

दरम्यान, सायबर क्राईमबाबत नुकत गृहमंत्रालयाने ट्विटरवर सावधानतेचा इशारा जारी केला होता. ट्विटरवरसायबर दोस्त या केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज करुन अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडून अनेक लोक यामध्ये बळी ठरले आहेत. अनेकांना यामुळे लुबाडलं गेलं आहे. सायबर क्राईमच्या अशा विविध घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकारने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार लोकांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये ते एक लिंकदेखील पाठवतात. या लिंकवर चुकूनही क्लिक केलं तर युजर्सचं मोठं नुकसान होत आहे. “तुमचं बँक खातं नॉमिनीसोबत जोडलं गेलं आहे. तुम्ही पुढच्या 30 मिनिटात नॉमिनीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकतात. जर तुम्ही तसं केलं नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन तक्रार दाखल करु शकतात, असं मेसेजमध्ये लिहिलेलं असतं.

 

 

मागे

मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई
मुंबई विमानतळावर पैसे घेऊन परदेशी प्रवाशांना अलगीकरणातून सूट, बीएमसीची मोठी कारवाई

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गैरव्यवहार ....

अधिक वाचा

पुढे  

रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू
रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात सहा....

Read more