By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्यभरातील शाळा कॉलेजसह खासगी क्लासेस २२ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या तारखेपासून मुंबई, ठाण्यातील शाळा, खासगी क्लासेस सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. यावर सकारात्मक निर्णय झाल्यास मुंबई ठाण्यातील शाळा, कॉलेजसह खासगी क्लासेस २२ फेब्रुवारीपासून सुरु होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी खासगी कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेतली. त्यावेळी हा प्रस्ताव देण्यात आला.
फेब्रुवारीपासून एमएमआर विभागातील शैक्षणिक संस्था सुरू होण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन असल्याचे संकेत मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावेळी दिले आहेत.
दरम्यान १५ फेब्रुवारीपासून अकृषी विद्यापीठे, कॉलेजेस सुरू होणार आहेत. या पार्श्वभुमीवर क्लासेस सुरू करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आलीय.
राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झालेले पाहायला मिळतंय. दरम्यान १ फेब्रुवारीपासून मुंबई विभागातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्या अहवालानुसार शाळा, कॉलेज आणि खासगी क्लासेसना परवानगी द्यायची का नाही ? यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी आढळल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल असे चहल म्हणाले.
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे व त्यांच्याशी सलग्न महाविद्यालयांचे वर्ग सोमवार, १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आळीपाळीने ५० टक्के विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात यावा, असे कृषी विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार हे वर्ग सुरु होणार आहेत.
मोदी सरकारने कोरोना लसीकरणानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CA....
अधिक वाचा