ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 24, 2020 10:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रत्नागिरीत सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होण्याच्या मार्गावर?; आज निर्णय होणार

शहर : रत्नागिरी

कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या शाळा अखेर 23 नोव्हेंबर (Maharashtra Schools Re-Open) पासून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. पण राज्यात शिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्यानं पालकांच्या मनात भीतीनं घर केलेलं आहे. त्यामुळे सुरू झालेल्या अनेक शाळा पुन्हा एकदा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सुरू झालेल्या शाळांबाबत आज पुनर्विचार होणार आहे.

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आज या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारपर्यंत पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असाही अंदाज बांधला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यातच रत्नागिरी जिल्ह्यातील निम्या शाळा कालपासून सुरू झाल्या होत्या. जवळपास 204 शाळांमध्ये 7 हजार 917 मुलांनी हजेरी लावली होती. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेवरून शिक्षणाधिकारी आणि आरोग्य विभागाने शाळा बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला, त्यावरच आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

60 टक्के कामकाज पालकांच्या संमतीवर अवलंबून

रत्नागिरी जिल्ह्यातील 458 शाळांपैकी 204 शाळा कालपासून सुरू झाल्या. 83 हजार 900 मुलांपैकी केवळ 2 हजार 281 पालकांची संमतीपत्र मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर 60 टक्के कामकाज पालकांच्या संमतीवर अवलंबून राहणार आहे. दापोली तालुक्यात सर्वाधिक 400 पालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. तर रत्नागिरी तालुक्यात केवळ 60 पालकांची संमतीपत्रे मिळाली आहेत. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता शाळा उघडण्याबाबत अनेक जिल्ह्यात संभ्रम दिसत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा उघडण्याला स्थगिती देण्यात आली आहे. तर सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, उस्मानाबादसह 22 ठिकाणच्या शाळा सुरू झाल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील 9 वी ते 12 शाळा आजपासून सुरु झाले आहेत. सर्वाधिक 20 शिक्षक कोरोनाबाधित सापडल्यानंतरही श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर दिले जात होते, मास्क घालून वि्द्यार्थी शाळेत दाखल झाले आहेत. राष्ट्रगीत गात आठ महिन्यांनंतर शाळांना सुरुवात झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 481 शाळेत 70 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.

पुढे  

COVID19 : महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली, उद्यापासून होणार लागू
COVID19 : महाराष्ट्र सरकारची नवी नियमावली, उद्यापासून होणार लागू

कोरोनाची (COVID19) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्याची येत आहे. त्या पार्श्वभू....

Read more