By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 22, 2020 03:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आज मध्यरात्रीपासूनच राज्यात कलम 144 लागू होणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. महत्त्वाचं काम नसेल तर 9 वाजल्यानंतर ही बाहेर पडू नका असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असून सर्वधर्माचे प्रार्थनास्थळ बंद राहणार आहेत. या शिवाय एसटी, खासजी बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची सेवा फक्त सुरु राहणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या विमानांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.जे लोकं परदेशातून आले आहेत त्यांनी समाजात मिसळू नका असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या Corona कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी....
अधिक वाचा