ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 30, 2020 10:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता

शहर : मुंबई

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही 'मिशन बिगिन अगेन ' नुसार हा लॉकडाऊन ३१ ऑगस्ट २०२०च्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवला आहे. मात्र, काही आऊटडोअर खेळांना आणि मॉल्समधील दुकानांना ॲागस्टपासून परवानगी देण्यात आलेली आहे. राज्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैला रात्री संपत होती. आता त्यात वाढ करण्यात आल्याचे शासनाने अद्यादेश काढून जाहीर केले आहे.

राज्यात ऑगस्टपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु होणार आहेत. सकाळी ते संध्याकाळी वाजेपर्यंत मॉल्स सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे आदेश जारी करताना मॉल्समधील थिएटर, फूड मॉल तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पार्सल देण्यासाठी परवानगी दिली आहे.

'मिशन बिगिन अगेन ' नुसार  नव्याने शिथिलतेचे नियमही कायम राहणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती आधीच्या नियमांप्रमाणेच असणार आहे. तसेच काही आऊटडोअर खेळांना आणि माॅल्समधील दुकानांना ॲागस्टपासून परवानगी देण्यात आलेली आहे.

३१ ऑगस्टपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद असणार आहेत. कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन सुरू राहील, असे केंद्राने जाहीर केले होते. सरकारने जी काही सूट दिली होती ती कंटेनमेंट झोनवगळता क्षेत्रासाठी आहे. कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहतील. रेल्वे आणि मेट्रो रेल्वे सेवा बंदच राहणार आहेत.

                                           

मागे

कोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी
कोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी

कोरोना विषाणूचा फैलावर वाढत असल्याने संक्रमित झालेल्यांना क्वारंटाईन करण....

अधिक वाचा

पुढे  

कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या – मुख्यमंत्री
कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या – मुख्यमंत्री

कोविड-१९ संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठा....

Read more