By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 05, 2019 03:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अकोला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब धाबेकर यांचे ८९ वर्षात निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी असल्या कारणाने त्यांचे मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी ११.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धाबा येथील घरी त्यांचे पार्थिव उद्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या दुपारी १२ वाजेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा हे त्यांचे मूळ गाव. धाबा या गावातूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. धाबा गावातील ग्रामपंचायत सदस्य ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. ते धाबा गावात उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती झाले. यानंतर कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले.
बाबासाहेब धाबेकर आमदार झाल्यानंतर यांनी शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा दिला आणि ते जलसंधारणमंत्री झाले. त्यांनी जलसंधारणाच्या कामांना गती दिली. तसंच सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी प्रयत्न केले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर अकोला मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, पण या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी त्यांचा पराभव केला होता. तीन वेळा आमदार होवून सुद्धा राज्य परिवहनमंत्री आणि जलसंधारण मंत्रीपद सुद्धा सांभाळले.
मिरजमधील सिव्हिल रुग्णालयाने दाखल असलेल्या 3 रुग्णांना रस्त्यावर फेकल्या....
अधिक वाचा