By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 02:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मुंबई - अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतातील शेअरबाजारांची चांगलीच घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी खाली आल्याने गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले, असे सांगण्यात आले. मात्र अनेक गुंतवणूकदारांनी शेअरबाजारातून पैसा काढून तो सोन्यात गुंतविण्यात प्रारंभ केल्याने सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसांमध्ये 1800 रूपये प्रतितोळा वाढ झाली आहे. आता सोनेदराने 41 हजार रूपयांची मर्यादाही पार केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, बाजाराचा सेन्सेक्स बाजार उघडताच ४०० अंकांनी उसळला. सध्या तो ५२७ अंकांनी वधारून ४१ हजार २०० अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही १५३ अंकांची कमाई करत १२१४५ अंकांचा स्तर गाठला आहे. सोमवारी सेन्सेक्समध्ये ७८७ अंकांची घसरण झाली होती. यामुळे गुंतवणूकदारांचे तीन लाख कोटींचे नुकसान झाले होते.
मुंबई - मुंबईच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. पर्यट....
अधिक वाचा