By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 06, 2020 09:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रायगडमधील खोपोलीजवळील (Khopoli) साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रासायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकल फॅक्टरीस भीषण स्फोट झाला, त्यात 2 जण ठार झाले आहेत, तर 6 जखमी आहेत. राज्यात दिवसेंदिवस होणाऱ्या स्फोटांवरच सामनाच्या अग्रलेखात बोट ठेवण्यात आलं आहे. कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक भरभराट ही आवश्यकच आहे. रोजगाराबरोबरच राज्याच्या वैभवातही ते भर घालत असतात. खासकरून महाराष्ट्र या औद्योगिक घोडदौडीमध्ये सदैव अग्रेसर असतो. मात्र या प्रगतीबरोबरच औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन करणेही तितकेच आवश्यक आहे. खोपोली आणि पालघरमधील कारखान्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांनी सुरक्षेचा विषय किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा समोर आले आहे.
सरकार आपल्यापरीने या संदर्भात नियम, कायदे करीतच असते. त्याचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी सगळय़ांचीच आहे. ज्या आधुनिक युगात आपण वावरतो आहोत तिथे अशा दुर्घटनांना थारा असूच शकत नाही. मोठ्या प्राणहानीपूर्वी स्फोटांची ही मालिका थांबवावीच लागेल, अशी भूमिका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केली आहे.
सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे
कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटाने गुरुवारी महाराष्ट्रातील रायगड आणि पालघर हे दोन जिल्हे हादरले. कंपन्यांमध्ये होणारे स्फोट ही दोन्ही जिल्ह्यांसाठी नवीन बाब नसली तरी नेहमीच होणाऱया या धमाक्यांकडे दुर्लक्ष तरी किती आणि का करायचे? उद्योगधंदे करणाऱ्या मंडळींना कुठल्याच बाबतीत इन्स्पेक्टर राज नको असते. काही बाबतीत ही दंडुकेशाही कारखानदारी आणि उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी मारक ठरते हे खरे असले तरी सरसकट मोकळीक देणेही अनेकदा घातक ठरू शकते. सुरक्षाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे दुर्घटनांना आमंत्रण मिळते व त्यातून कामगारांच्या जिवाशी खेळ होतो. कधी कारखान्यांतून विषारी वायुगळतीच, कधी आगीच्या घटना घडतात, आसपासचा परिसर हादरवून सोडणारे भयंकर स्फोट!
पालघर आणि खोपोलीमध्ये घडलेल्या स्फोटांच्या ताज्या घटनांनी सुरक्षा नियमांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. गुरुवारी पहाटे पहिला स्फोट झाला तो खोपोलीजवळच्या ढेकू औद्योगिक वसाहतीमध्ये. जसनोव्हा केमिकल या रासायनिक कंपनीतील रिऍक्टरचा मध्यरात्री अडीच वाजता भयंकर स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, जसनोव्हा कंपनी तर या स्फोटात उद्ध्वस्त झालीच, पण आसपासचा चार किलोमीटरचा परिसर या आवाजाने दणाणून सोडला. साखरझोपेत असलेल्या आसपासच्या गावांतील नागरिकांची भीतीने गाळण उडाली. कानठळ्य़ा बसवणाऱया स्फोटाच्या आवाजाने एका महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. लगतच्या पेट्रोलपंपावर काम करणारे चार सुरक्षारक्षक गंभीररीत्या जखमी झाले. यातील एका रक्षकानेही नंतर रुग्णालयात प्राण सोडला. स्फोटानंतर लागलेली भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल चार तास झुंजावे लागले. जसनोव्हा कंपनीपासून एक किलोमीटरच्या परिसरातील घरे आणि कार्यालयांच्या काचा फुटल्या. काही ठिकाणचे तर शेडही कोसळल्याच्या बातम्या येत आहेत.
स्फोटाच्या या घटनेमुळे जवळच्या पेट्रोलपंपात आग भडकली असती तर किती भीषण दुर्घटना झाली असती याची कल्पनाही करवत नाही. जसनोव्हा कंपनीतील ही दुर्घटना रिऍक्टर फुटल्यामुळे घडली तर पालघरमधील आरती ड्रग्ज या कंपनीत स्फोट झाला तो कंडेन्सर फुटल्यामुळे. या घटनेत एक कामगार जखमी झाला, पण सुदैवाने प्राणहानी झाली नाही. दोन्ही घटनांतील स्फोटाची कारणे यथावकाश चौकशीतून पुढे येतीलच. पण अशा घटना टाळण्यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन याविषयी आपण गंभीर कधी होणार? धोकादायक व ज्वलनशील रासायनिक उत्पादने घेणाऱ्या कंपन्यांचे चालक-मालक आणि प्रशासनाने आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अन्यथा कारखान्यांमधील स्फोट, आगी आणि वायुगळतीच्या दुर्घटनांना लगाम बसणार नाही. याच वर्षी जानेवारी महिन्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका औषधी कंपनीत भीषण स्फोट होऊन आठ जण मरण पावले आणि 25 किलोमीटरचा परिसर या भयंकर धमाक्याने हादरला. एप्रिल महिन्यातही तारापूरमध्येच एका कंपनीत हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या टाकीत स्फोट होऊन तीन जण मृत्युमुखी पडले. तारापूर आणि पालघरमध्ये तर सतत धमाक्यांची साखळी सुरू असते. स्फोटांची शहरे हीच आता त्यांची ओळख बनली.
‘महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. इथं सर्वकाही कायद्यानुसार चालतं. अर्....
अधिक वाचा