ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 18, 2020 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

शहर : देश

भारतात (India) कोरोना लस कधी येणार याकडे सर्वच भारतीयांचं लक्ष लागून आहे. त्यातच आता कोरोना लस उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी सीरम इंस्टीट्युटच्या अधिकाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार मार्च 2021 पर्यंत भारतात कोरोना विषाणूवरील लस उपलब्ध होऊ शकणार आहे

सीरम इंस्टीट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव (Dr. Suresh Jadhav) म्हणाले, “अनेक कंपन्या कोरोना लस तयार करण्यावर वेगाने काम करत आहेत. भारतात देखील कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचण्या वेगाने होत आहेत. सीरम इंस्टीट्यूट देशात ऑक्सफोर्ड-अस्त्राजेनेताच्या कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणी करत आहे. जर नियंत्रकांनी लवकर मंजूरी दिली तर मार्च 2021 पर्यंत भारतात कोरोना लस उपलब्ध होईल.”

“देशातील दोन कोरोना लस उत्पादन कंपन्या तर तिसऱ्या म्हणजेच अंतिम टप्प्यातील कोरोना लस चाचणी करत आहेत. अन्य एक कोरोना लस सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत आहे. इतरही कोरोना लस उत्पादन कंपन्या वेगाने काम करत आहेत,”  असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना लस उपलब्ध होण्याबाबत अंदाज व्यक्त केला होता. जगभरात कोरोनाच्या 10 लस चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यापैकी कोणती ना कोणती लस 2020 च्या अखेरपर्यंत किंवा 2021 च्या सुरुवातीला या लस यशस्वीपणे नोंदणीकृत होईल, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती (WHO Chief Scientist on Corona Vaccine availability).

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या होत्या, “जगभरात जवळपास 40 कोरोना लशीचे नमुने कोणत्या ना कोणत्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीत आहेत. त्यापैकी जवळपास 10 कोरोना लस तर तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीपर्यंत पोहचल्या आहेत. हा कोरोना लस चाचणीचा अंतिम टप्पा आहे. या वैद्यकीय चाचणी लस किती प्रभावी आणि सुरक्षित असेल हे दाखवून देतात. त्यामुळे डिसेंबर 2020 किंवा 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यात कोरोना लस तयार होईल अशी आशा आहे.”

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी या 10 पैकी कोणती ना कोणती लस यशस्वी होऊन वर्षअखेरपर्यंत उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली होती.

पुढे  

आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत
आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत

कोरोना व्हायरसचा coronavirus वाढता प्रादुर्भाव पाहता त्यात पार्श्वभूमीवर जवळपास ....

Read more