By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : धुळे
ऊसतोडीसाठी उस्मानाबाद येथे जात असलेल्या मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी असून, अन्य सात किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांत महिला आणि लहान मुलांचा समावेश प्रामुख्याने आहे. अपघाताचे दृश्य इतके भयाण होते की अनेकांच्या अश्रू अनावर झाले होते. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात झाला.
धुळे सोलापूर महामार्गावरील हे दुर्घटना असून बोरी नदीच्या पुलावरून हा अपघात झाला आहे. या अपघातातील मयत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मजूर आहेत. अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुलावरून टेम्पो थेट नदीपात्रात कोसळला.
Maharashtra: 7 people killed and more than 20 injured after a pick up vehicle fell off a bridge in a river near Vinchur in Dhule, early morning today. pic.twitter.com/5UgLg8rOFC
— ANI (@ANI) November 30, 2019
अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी वीसएक जणांना पाण्यातून बाहेर काढले. जखमींना स्थानिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वाहनाच्या चालकाला पुल अरुंद असल्याचा अंदाज न आल्याने त्याचा ताबा सुटून हा अपघात झाला.
देशाचा विकासदर दिवसेंदिवस घसरत चाललेला दिसतोय. सप्टेंबर महिन्यात देशाचा आ....
अधिक वाचा