By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उल्हासनगर : अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा येथे माघी गणेशोत्सवानिमित्त एका पूजेच्या कार्यक्रमातील जेवणातून ७ नागरिकांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. यात पाच लहान मुलांचाही समावेश आहे. अंबरनाथ तालुक्यातील दुर्गादेवी पाडा येथील मुकणे कुटुंबीयांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्त पूजा ठेवण्यात आली होती.
रविवारी दुपारी पूजेनिमित्त तयार करण्यात आलेले जेवण मुकणे यांच्या घरी आलेल्या सर्व नातेवाईकांनी खाल्ले. मात्र जेवणानंतरच तेथील काही जणांना उलट्या, जुलाब होऊ लागले. सर्व नागरिकांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात आरुषी मुकणे (६), निखिल मुकणे (९), आयुष (७), नवीन (७), सानिका (१२) या लहान मुलांचाही समावेश होता. यातील काही रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे डॉक्टर राजेश तडवी यांनी दिली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तपत्राच्या सहाय्याने सैन्यामधील ....
अधिक वाचा