By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 22, 2020 11:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलंच झोडपलं आहे. मुंबईमध्ये गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटांसह आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) उद्याही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
#WATCH: Several parts of Mumbai received heavy rainfall today leading to waterlogging in some areas. Visuals from Sion-Matunga road.
— ANI (@ANI) September 22, 2020
India Meteorological Departmemt (IMD) predicts 'generally cloudy sky with heavy rain' for Mumbai tomorrow. pic.twitter.com/6B5je5m4g7
मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. आज सकाळी ८ ते रात्री १० या कालावधीत मध्य मुंबईत ५६.६२ मिमी, पूर्व उपनगरात २१.४१ मिमी आणि पश्चिम उपनगरात ४०.३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
#WATCH Mumbai: Several parts of the city received heavy rainfall today. Visuals from Lower Parel.
— ANI (@ANI) September 22, 2020
India Meteorological Departmemt (IMD) predicts 'generally cloudy sky with heavy rain' for Mumbai tomorrow. pic.twitter.com/9FDt6nsOMI
मुंबईच्या पश्चिम भागात कुलाब्यापासून भाईंदरपर्यंत ढग दाटून आले आहेत. या ढगांची जास्तीत जास्त उंची ७ ते ८ किमी आहे, त्यामुळे मुंबईत मागच्या ३ ते ४ तासात मुसळधार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी ७० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या ३ ते ४ तासांमध्ये अशाच पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
भिवंडीत इमारत दुर्घटनेचे बचावकार्य अजूनही सुरू आहे या इमारत दुर्घटनेचा आढ....
अधिक वाचा