ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात

शहर : मुंबई

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. शरद पवार यांची संजय राऊत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ देखील लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी म्हटलं आहे, शिवसेनेशिवाय सत्तास्थापन करणं कुणालाही शक्य नाही.संजय राऊत हे काल छातीत दुखत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं आहे, 'लहरो से डरकर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती.'काँग्रेसनेते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आज रात्री साडेआठपर्यंत सत्तास्थापन करण्याची वेळ राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिली आहे, राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

मागे

ट्रोल करताना सावधान! पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई
ट्रोल करताना सावधान! पंतप्रधान, राष्ट्रपतींचा फोटो वापरल्यास मोठी कारवाई

राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अशा देशातील प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोटो जाहिरा....

अधिक वाचा

पुढे  

रामनवमीपासून राम मंदिर उभारणीस सुरुवात होण्याची शक्यता
रामनवमीपासून राम मंदिर उभारणीस सुरुवात होण्याची शक्यता

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच वाढलाय. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते ....

Read more