ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शरद पवार करणार इंदु मिलच्या जागेची पाहणी!

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवार करणार इंदु मिलच्या जागेची पाहणी!

शहर : मुंबई

           मुंबई : घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित असलेल्या दादर येथील इंदु मिलच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या सायंकाळी ३:३० वाजता करणार आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक अश्या महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असल्याने यामध्ये इंदु मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश आहे.

             उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्य मंत्री नवाब मलिक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  इंदु मिलमधील स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी केली होती. त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी या जागेची पाहणी शरद पवार करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले होते.   

 

मागे

चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी करता येणार
चर्चगेट-विरार एसी लोकलमध्येही खरेदी करता येणार

       मुंबई - पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार या एसी लोकलमध्ये प्रवाशा....

अधिक वाचा

पुढे  

४० लेकरांची माय 
४० लेकरांची माय 

        हिंगोली - जिल्हा परिषदेत शिक्षक असलेल्या पण स्वत: पायाने दिव्या....

Read more