ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकरी आंदोलनासाठी शरद पवार सक्रिय; विरोधी पक्षांची मोट बांधण्याची तयारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2020 10:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकरी आंदोलनासाठी शरद पवार सक्रिय; विरोधी पक्षांची मोट बांधण्याची तयारी

शहर : मुंबई

मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन निर्णायक (Farmers protest) टप्प्यावर पोहोचले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सक्रिय झाले आहेत. या आंदोलनासंदर्भात आपण देशातील इतर पक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भाजप विरोधकांची मोट कशी बांधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात भाष्य केले. दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात मी इतर पक्षांसोबत बोलणार आहे. यापूर्वी आम्ही पाच ते सहा राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. आम्ही केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात सांगितलेच आहे, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे आता शरद पवार यांच्या या भूमिकेचे राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारला मोठे यश, चिल्ला सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे

गेल्या 12 दिवसांपासून चिल्ला सीमेवर सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे. काही शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेत दिल्ली-नोएडा सीमा खुली केली.

तर दुसरीकडे उर्वरित शेतकरी संघटनांनी केंद्र सरकार बधत नसल्याचे पाहून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी प्रमुख शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते सोमवारी उपोषण करणार आहे. तर रविवारी दिल्ली-जयपूर महामार्गावर हजारो शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मोर्चा काढला जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या आडून काँग्रेस आणि डाव्यांचे आंदोलन- साध्वी प्रज्ञा

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी शेतकरी आंदोलनाच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. शेतकऱ्यांच्या वेषात लपून काँग्रेस आणि डाव्यांकडून हे आंदोलन केले जात आहे. कृषी कायद्यांविरोधात संभ्रम पसरवला जात आहे, असा आरोप साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला.

पुढे  

Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार, Tata Consultancy सल्लागार राहणार : विहिंप
Larsen & Toubro कंपनी राम मंदिर बांधणार, Tata Consultancy सल्लागार राहणार : विहिंप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे ....

Read more