By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दादरसारख्या गजबजलेल्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या ‘शारदा’ या थिएटरचाही समावेश झाला आहे. ही जागा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मालकीची असून ट्रस्टने थिएटरची जागा भाड्याने दिली होती. भाड्याची मुदत संपल्यानंतर व त्याबाबतची न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ‘शारदा’ थिएटर चालवणार्या भाडेकरूना ट्रस्टने थिएटरमधील खुर्च्या, प्रोजेक्टर, वातानुकूलन यंत्रणा, त्याचबरोबर छताचा भागही हलवण्यास भाग पाडल्याने थिएटरच्या ठिकाणी आता फक्त भिंती उभ्या असून आणखी एक पडदा थिएटर काळाच्या पडद्याआड निघाले आहे. मात्र, थिएटर वाचवण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बचाव समितीने जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ताब्यात असलेला मोक्याच्या ठिकाणचा हा भूखंड अडीच एकरचा आहे. त्यावर ग्रंथसंग्रहालय उभे आहे. परंतु, ट्रस्टने उर्वरित जागा 1970 मध्ये गांधी एक्झिबिटर्स अँड डिस्ट्रिब्युटर्स यांना भाडेपट्टीवर दिली. त्या जागेवर 750 खुर्च्यांचे ‘शारदा’ थिएटर उभे राहिले. परंतु, करार संपल्यानंतर ट्रस्टने ही जागा खाली करण्यास सांगितल्यानंतर ही बाब न्यायालयात गेली. मात्र, न्यायालयानेही ट्रस्टच्या बाजूने निकाल दिल्यानंतर डिस्ट्रिब्युटर्सने 17 एप्रिल रोजी ही जागा ट्रस्टच्या ताब्यात दिली. परंतु, वास्तूचा ताबा परत घेताना ट्रस्टने डिस्ट्रिब्युटर्सला कन्सेंट डिक्रीनुसार थिएटरमधील खुर्च्या, प्रोजेक्टर, वातानुकूलन यंत्रणा, त्याचबरोबर छताचा भागही हलवण्यास भाग पाडल्याने आता तेथे फक्त भिंती उभ्या आहेत.
ट्रस्ट आणि भाडेकरूमध्ये झालेल्या कन्सेंट डिक्रीची अंमलबजावणी करणार्या कार्यकारी समितीमध्ये अॅडव्होकेट आनंद काटे यांचाही समावेश होता. त्यांनी याबाबत सांगितले, की आम्ही कार्यकारी समितीच्या बैठकीत येथील पायाभूत सुविधा कायम ठेवून बिलाबाबत अंतिम निर्णय घेण्याची शिफारस ट्रस्टला केली होती. परंतु, तिचे पालन करण्यात आले नाही.
आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जाणा....
अधिक वाचा