By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 09, 2019 10:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतिंनंतर औटोरिक्षा चालक मालक मालकांचा संप मागे घेत असल्याचे ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी संगितले . ओला ,उबेर बेकायदेशीर टॅक्सी सेवा तत्काल बंद करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह आणि प्रलंबित मागण्यांसाठी ऑटो रिक्शा चालक मालक आज संपावर जाणार होते.
मुंबईतील 1 लाख 75 हजार तर महाराष्ट्रातील 18 लाख रिक्शा चालक मालक बेमुदत संपावर जाणार होते. या संपावर नागपूरसह पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आदि ठिकाणी मोठा फटका बसणार होता. तथापि, प्रवाशाची नाराजी ओढवू नये, त्यांची कोंडी होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीने यावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी 3 वाजता परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात ऑटो रिक्शा चालक मालकांच्या मागण्या संदर्भात चर्चा होणार आहे.
मुंबई आणि उपनगरात सकाळी मुसळधार पाऊस कोसळला. त्याचा फटका मुंबईच्या रस्ते व....
अधिक वाचा