By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 16, 2019 01:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
शिर्डीत ३ दिवस चालणार्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सोमवारपासूनच सुरवात झाली आहे. आज उत्सवाचा मुख्य दिवस असून साईबाबांना गुरु मानणारे हजारो साईभक्त आज बाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमेंनिमित्त साईमंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. शिर्डीत प्रचंड गर्दी झाल्याने व्हीआयपी पाससेवा बंद करण्यात आली आहे.
उत्सवाच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येते. मात्र आज चंद्रग्रहण असल्याने रात्री साईबाबांची शेजारती झाल्यानंतर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी मध्यरात्री दर्शनाला येणार्या भाविकांना आज दिवसभरातच बाबांचे दर्शन ज्ञावे लागणार आहे.
शिवसेनेचे स्वप्न असलेल्या कोस्टल रोडला मुंबई उच्च न्यायालयाने रेड सिग्नल ....
अधिक वाचा