ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Coronaमुळं शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Coronaमुळं शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांसाठी बंद

शहर : shirdi

कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. परिणामी प्रशासनाकडून सर्वत्र सतर्कता पाळण्यात येत आहे. याच धर्तीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्वांनाच सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. ज्यानंतर लगेचच किंबहुना त्याआधीपासूनच राज्यातील बहुतांश मंदिरांमध्ये भाविकांसाठीचा प्रवेश बंद करण्यात आला.

शिर्डी येथील साईबाब मंदिर प्रशासनानेही आता हा निर्णय अंमलात आणण्यास सुरुवात केली असून, मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाविषयीची वाढती दहशत आणि त्याचा अतिशय झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला.

सध्याच्या घडीला समोर येणाऱ्या माहितीनुसार जनसंपर्क आणि बायोमेट्रिकच्या माध्य़मातून देण्यात येणारे पासही बंद करण्यात आले आहेत. पास असणाऱ्या भाविकांचं दर्शन पाच वाजण्याच्या सुमारा हे भाविक मंदिराबाहेर येतील. परिणामी सायंकाळी धुपारतीसाठी मंदिरात फक्त पुजाऱ्यांची उपस्थिती असेल असा अंदाज वर्तण्यात येत आहे.

येत्या काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेला गुढीपाडवा, राम नवमी हे महत्त्वाचे दिवस पाहता शिर्डीनगरीकडे येणाऱ्यांचं प्रमाण हे लक्षणीयरित्या वाढण्याची अपेक्षा होती. पण, कोरोनाच्या कहरामुळे भाविकांना आणि असंख्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अखेर शासनाने दिलेले निर्देश पाळत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याच्या अंतिम निर्णयावर संबंधित संस्थानचे अधिकारी पोहोचले आहेत.

मागे

लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात लॉक डाऊन लागू होणार का?
लॉक डाऊन म्हणजे काय? महाराष्ट्रात लॉक डाऊन लागू होणार का?

चीनमधील वुहानमधून कोरोना व्हायरस जगभर पसरला. जगभरात आता कोरोनाने थैमान मां....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी

पन्हाळा गडासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी....

Read more