ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 20, 2020 11:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नाताळमध्ये साई दर्शनासाठी शिर्डी संस्थानाची नवी नियमावली

शहर : shirdi

नाताळच्या सुट्ट्यांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन साई दर्शनासाठी संस्थानाने (Shirdi Sanstha New Rules) नवी नियमावली जारी केलीय. गर्दीच्या काळात दर्शन पास काऊंटरवर मिळणार नाही. साई भक्तांना संस्थानाच्या वेबसाईटवर पास आरक्षित करावा लागणार आहे. मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गर्दीच्या काळात जास्तीत जास्त १२००० साईभक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देणे शक्य होणार आहे. सशुल्क दर्शनपास आरक्षण केल्यापासून ५ दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण तारखेपासून दोन दिवसांसाठी उपलब्ध असेल.

नाताळ सुट्ट्यांसाठी साई संस्थानची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पासशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.  संस्थानच्या वेबसाईटवरून दर्शन पास घेणे अनिवार्य असणार आहे. दररोज १२ हजार भाविकांना प्रवेश देणे शक्य होणार असल्याचं म्हटलं आहे.

लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुर्हूतावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरामध्ये एका दिवसात दररोज सहा हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ दिला जात होता. त्यानंतर दररोज साधारणपणे आठ ते नऊ हजार साईभक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा, यादृष्टीने शिर्डी संस्थानने नियोजन सुरू केले होते. त्याप्रमाणे आता शिर्डी संस्थानने नाताळकरता नवी नियमावली जाहीर केली आहे.

मागे

अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर
अकरावी प्रवेशासाठी विशेष वेळापत्रक जाहीर

अकरावीच्या ऍडमिशनसाठी (Eleventh standard admission entrance special list details)येत्या गुरूवारपासून विशेष प्....

अधिक वाचा

पुढे  

नाताळ, नववर्षांला संचारबंदी असणार? महापालिका लवकरच नियमावली जाहीर करण्याची शक्यता
नाताळ, नववर्षांला संचारबंदी असणार? महापालिका लवकरच नियमावली जाहीर करण्याची शक्यता

कोरोनाचा धोका अद्यापही कायम असताना राज्यात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागत....

Read more