By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 04:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जालना
जालना - देशात अनेक ठिकाणी थंडीची लाट असतानाच आता राज्यातही बऱ्याच ठिकाणी असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यभरातही आता थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडीपासून बचावासाठी आपण नियमित स्वेटर, मफलरचा वापर करतो. पण या थंडीचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसतो त्याचं काय ? या साऱ्याचाच विचार जालन्यातील टेंभुर्णी गावातील एका कुटुंबाने अनोखी शक्कल लढवली आहे. या कुटुंबाकडे असलेल्या शेळ्यांना घरातील निरुपयोगी शर्ट घालायला त्यांनी सुरुवात केली आहे.
जालना जिल्ह्यातील टेंभूर्णीच्या गावकऱ्यांना थंडी आल्याची वर्दीच मिळाली. कारण त्यांच्या गावातल्या सलीम बागवान यांच्या बकऱ्यांच्या अंगावर कपडे दिसू लागले आहेत. दरवर्षी थंडी आली की, सलीम बागवान यांच्या घरच्या बकऱ्यांच्या अंगावर कपडे दिसू लागलात. त्यांच्या बकरीला शर्ट घालण्यात आला आहे, करडूच्या अंगावर टी-शर्ट चढवण्यात आला आहे. बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी दरवर्षी बागवान यांच्या घरच्या शेळ्यांना कपडे चढवले जातात. बागबान कुटुंब स्वता: च्या कुटुंबातल्या भाग असलेल्या बकरी आणि करडूची काळजी घेतात.
प्रतींनिधी- अनुज केसरकर-:विकास व संशोधन प्रतिष्ठान (DRF) आयोजित 'कवितांज....
अधिक वाचा