By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2019 01:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शिवसेनेने गिरगावात मेट्रोविरोधात सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबई मेट्रोसाठी केल्या जाणाऱ्या खोदकामामुळे इमारतींना तडे जात असल्याचा आरोप आहे.
मेट्रोच्या कामांमुळे डंपर 24 तास सुरु आहेत. त्यामुळे परिसरात भयंकर ट्रॅफिक जॅम होतं. डंपरमुळे अपघात होतात. आवाज आणि गोंगाटामुळे जगणं मुश्किल झालं आहे”, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. जोपर्यंत डंपर बंद होत नाहीत, जोपर्यंत लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा शिवसेना नेते पांडुरंग संपकाळ यांनी दिला.
शिवसेना दक्षिण मुंबईच्या विभाग क्र. 12 च्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे. गिरगाव आणि ठाकूरद्वार इथे मेट्रो 3 आणि डी. बी. रियालिटी यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी आणि गैरसोय होत आहे. शाळेच्या बस देखील शाळेत उशीरा पोहोचत आहेत. अनेक रहिवाशांचे दुचाकी अपघात होत आहेत. स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास आणि गैरसोय होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शिवसेना दक्षिण मुंबईच्या विभाग क्र. 12 च्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे
हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व (दुरुस्ती) विधयेक 2019 वर चर्चा होईल. हा सरकारचा मु....
अधिक वाचा