ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती

शहर : मुंबई

           मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९४ वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ फुलांनी सजविण्यात आले आहे. या स्मृतिस्थळावर येऊन अनेक मान्यवरांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली. यात मोठ्या संख्येने शिवसैनिकही होते. त्याचबरोबर शिवसेनेतर्फे बिकेसी येथे जल्लोष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

            दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगावमधील नेस्को ग्राऊंडवर राज्यव्यापी अधिवेशन सकाळी ९ वाजल्यापासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे संध्याकाळी मनसेची आगामी भूमिका काय असेल हे स्पष्ट करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

        त्याचवेळी नवी वाट चोखाळणार्‍या शिवसेनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात बीकेसीमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. दरम्यान बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात ठिकठिकाणी महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आदी सामाजिक उपक्रमांचे शिवसैनिकांकडून आयोजन करण्यात आलं आहे.   
 

मागे

प्रजाकसत्ताक दिनादिवशी देशभरात हायअलर्ट
प्रजाकसत्ताक दिनादिवशी देशभरात हायअलर्ट

       नवी दिल्ली : प्रजाकसत्ताक दिन नुकत्याच दिवसांनी येणार असल्यास या ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वर्षभरात एकूण ९२ अपघाती मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर वर्षभरात एकूण ९२ अपघाती मृत्यू

       मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर विख....

Read more