ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर अपघातात गंभीर जखमी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 11, 2020 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर अपघातात गंभीर जखमी

शहर : बुलढाणा

        बुलडाणा - मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात संजय रायमूलकर यांच्यासह त्यांचा चालक आणि एक बॉडीगार्ड गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे.

       जिल्ह्यात मेहकर विधानसभा मतरदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या गाडीला नायगाव दत्तपूर गावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात आमदार रायमुलकर यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच रायमुलकर यांचे बॉडीगार्डही गंभीर जखमी झाले आहे.

    रायमुलकर यांची गाडी मेहकरकडे येत असताना त्यांच्या इकोस्पोर्ट गाडीची आणि मेटॅडोरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात आमदारांची गाडी पलटी झाली. त्यासोबतच मेटॅडोर ट्रकही पलटी झाला.

      दरम्यान सध्या आमदार संजय रायमुलकर, चालक पंजाम गुडधे आणि बॉडीगार्ड ज्ञानेश्वर निकस यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिकांसह रायमुलकर यांच्या कार्यकर्त्यांनी मेहकरच्या मल्टी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली.
 

मागे

उत्तर प्रदेशमध्ये बस-ट्रक अपघातानंतर भीषण आग; २० जण ठार
उत्तर प्रदेशमध्ये बस-ट्रक अपघातानंतर भीषण आग; २० जण ठार

       लखनऊ - उत्तर प्रदेशच्या कानौजमध्ये शुक्रवारी रात्री बस आणि ट्रकच....

अधिक वाचा

पुढे  

सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी संभाजीराजांचे उपोषण सुरू
सारथी संस्थेची स्वायत्तता कायम ठेवण्यासाठी संभाजीराजांचे उपोषण सुरू

          पुणे - सारथी संस्थेच्या गैर कारभाराविरोधात खासदार छत्रपती संभ....

Read more