ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान, सामनातून मोदींवर टीका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2021 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30

न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान, सामनातून मोदींवर टीका

शहर : मुंबई

प्रजासत्ताकदिनी म्हणजे 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे?, असा सवाल करत न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमान आहे, अशी जोरदार टीका आजच्या सामनाच्या अग्रेलाखातून करण्यात आली आहे. (Shivsena Criticized Pm Modi Through Saamana Editorial Over Delhi Farmer Protest)

शेतकरी आंदोलनात तिरंग्याचा अपमान दिसत नाही

गेल्या साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले, असं अग्रलेखात म्हटलंय.

भाजपपेक्षा शेतकऱ्यांना तिरंग्या प्यारा

तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे. तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी? पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

शेतकऱ्यांना तडफडून मरु देणं हा देखील तिरंग्याचा अपमान

शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही. हातात आणि ट्रॅक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे, असंही अग्रलेखात म्हटलंय.

गाझीपूरला आंदोलन करणारे शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत?

तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱ्यांची पोरं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात? निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आणि शेतकरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे टाळीचे वाक्य आहे, पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे लाखो शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत? शेतकऱ्यांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेच, पण शेतकऱ्यांना पोलिसी दंडुक्याने चिरडणे हा तिरंग्याचा अपमान आहे हेदेखील तेवढेच खरे आहे, असंही सामनातून ठणकावून सांगण्यात आलं आहे.

हे सर्व कठोर प्रयोग लडाखच्या सीमेवर केले असते तर.

सरकारला तिरंग्याच्या अपमानाची चिंता वाटणे ही गर्वाचीच गोष्ट आहे. पण तिरंग्याचा तथाकथित अपमान फक्त आंदोलक शेतकऱ्यांनीच केला आहे काय? शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांच्या सशस्त्र फौजा उभ्या केल्या गेल्या आहेत. लोखंडी कठडे उभे करण्यात आले आहेत. डांबरी रस्त्यांवर खिळे मारून ठेवले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्लीत पुन्हा येऊ नये म्हणून काय हा कडेकोट बंदोबस्त! हे सर्व कठोर प्रयोग लडाखच्या सीमेवर केले असते तर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसून आपल्या बापाचीच जमीन असल्यासारखे बसून राहिले नसते, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय.

मागे

CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा
CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) यांनी केंद्री....

अधिक वाचा

पुढे  

Costal Road : वरळीतील ‘लोटस जेट्टी’बाबत स्थानिक मच्छिमारांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Costal Road : वरळीतील ‘लोटस जेट्टी’बाबत स्थानिक मच्छिमारांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

कोस्टल रोडच्या कामात अडथळा आणणाऱ्या याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्....

Read more