ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनेकडून एक रुपयाही नाही, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांचा दावा; अनिल देसाईंकडून स्पष्

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 08:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनेकडून एक रुपयाही नाही, अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांचा दावा; अनिल देसाईंकडून स्पष्

शहर : मुंबई

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांची घोषणा केली होती. मात्र अद्याप याचा एकही रुपया मिळाला नसल्याचा दावा राम मंदिर ट्रस्ट निर्मितीचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी केला होता. मात्र हा दावा खोडून काढत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी 1 कोटी रुपये दिले असल्याचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अनिल देसाई यांनी 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती दिली. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या वेळी राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी देऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी स्टेट बँकेत जमा केला आहे. त्याबाबत अनिल मिश्रा आणि खजिनदार चंपकलाल यांनीही ते पैसे मिळाल्याची पोचपावती दिली.

राम मंदिर ट्रस्ट निर्मितीचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी शिवसेनेकडून पैसे मिळाला नसल्याचा दावा केला होता.” त्यावर अनिल देसाई यांनी व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान राम मंदिर ट्रस्ट निर्मितीचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनीउद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली होती. मात्र यातील एकही रुपया अद्याप ट्रस्टला मिळालेला नाही. त्यामुळे हे एक कोटी नेमके कुठे गेले याबाबतचे अनेक प्रश्न उपस्थितीत होत होते. मात्र या सर्व प्रश्नांवर उत्तर दिले.”

अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र मंत्रोचाराच्या जयघोषात भूमिपूजन करतील. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल. अयोध्येत त्या पवित्र सुवर्ण मुहूर्तासाठी जोमात तयारी चालली आहे.

पंतप्रधान मोदी सकाळी 11:30 वाजता अयोध्येत पोहोचून भाषण करतील. या ठिकाणी 200 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास दोन तास हा कार्यक्रम चालणार आहे. निश्चित मुहूर्त आणि दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्याची तयारी यानुसार पूजा केली जाईल.

 

मागे

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आ....

अधिक वाचा

पुढे  

Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात
Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर या....

Read more