ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही; सत्तार गरजले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2020 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही; सत्तार गरजले

शहर : धुळे

राज्याचे महसूल आणि ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी आता थेट भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच ललकारले आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी गर्जनाच अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील राजकारण अधिकच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना रावसाहेब दानवे यांनाही ललकारले. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणा नाही, असं सत्तार म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचाही समाचार घेतला. राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

नक्कल करण्यात भाजप आघाडीवर

भाजप नक्कल करण्यात आणि खोटं बोलण्यात नेहमीच आघाडीवर असते, असं सांगतानाच आम्हीही राजकीय भाषेचा वापर केला तर भाजप आमच्यासमोर टिकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपला धडा शिकवा, निधी कमी पडू देणार नाही

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला तरच शिवसेनेची ताकद दिसून येईल, असं सांगतानाच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. (shivsena minister abdul sattar slams raosaheb danve)

फडणवीसांना टोला

भाजपचे काही नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत असतात. बाहेर मात्र विरोध केल्यासारखं दाखवत असतात, असं ते म्हणाले. शिवसेनेशी गद्दारी केल्यानेच भाजप सत्तेबाहेर आहे. ते पुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणाले. पण ते आलेच नाही. मी मात्र शिवसैनिक म्हणून नक्कीच येणार, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी जिल्ह्यात शिवसेनेची वाताहत होत असल्याबद्दल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. याप्रसंगी हिलाल माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

मागे

पीएम किसान सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांना लाभ; सरकारकडून पैसे परत घेण्याची मोहीम
पीएम किसान सन्मान योजनेचा अपात्र शेतकऱ्यांना लाभ; सरकारकडून पैसे परत घेण्याची मोहीम

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू ....

अधिक वाचा

पुढे  

New Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव
New Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव

दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्य....

Read more